मराठी/English
मुख्य पान     आमच्या सेवा     आमचे साथी     केलेले काम     संपर्क
   
सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे पंप

आम्ही पुरवतो किर्लोस्कर ब्रदर्स यांचे सौर उर्जेवर चालणारे पाण्याचे पंप. किर्लोस्कर ब्रदर्स हे पाण्याच्या पंपाचे जगातले अग्रगण्य आणि प्रसिद्ध उत्पादक आहेत

आदिउर्जा केवळ पंप नव्हे, तर उत्तम प्रतिचे सोलार मॉडुल्स, मॉडुल्सची बैठक आणि सर्व केबलिंग हे सुद्धा पुरविते. आमचे अनुभवी तंत्रज्ञ एका दिवसात तुमच्या शेतावर हा पंप बसवून तुमचे पाण्याचे प्रश्न कायमचे सोडवतील. केन्द्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना तुम्हाला आर्थिक मदत करू शकतात आणि आम्ही तुम्हाला या योजनांसाठी अर्ज तयार करण्यास सर्व साहाय्य पुरवू. कृपया तुमच्या पाण्याच्या गरजा आणि विहिरीची माहिती या फॉर्म मध्ये भरून आम्हाला पाठवा:
(हा फॉर्म नवीन टॅब किंवा विंडो मधे उघडतो)
सौर उर्जेवर चालणारे विजेचे संयंत्र

वीज महाग आहे आणि दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत आहे. जर तुम्ही आदिउर्जा चे सौर उर्जेवर चालणारे विजेचे संयंत्र वापरले तर तुम्ही ₹५ पेक्षा कमी दराची वीज मिळू शकते.

सौर उर्जेवर चालणारे विजेचे संयंत्र हे सुरुवातीला महाग वाटत असले तरी इंधनासाठीचा खर्च हा शुन्य असल्यामुळे सुरुवातीचा सर्व भांडवली खर्च ७ वर्षांच्या आत भरून येतो. एकदा का हा भांडवली खर्च भरून निघाला, की पुढील सर्व वर्षे (संयंञाचे आयुष्य कमीत कमी २५ वर्षे) सर्व वीज जवळपास फुकट मिळू शकते. तुम्ही स्वतःच गणित करून बघा:
(हा कॅलक्युलेटर नवीन टॅब किंवा विंडो मधे उघडतो)